महाराष्ट्रात म. जोतीबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं किंवा तामिळनाडूमध्ये पेरियार यांचं जे योगदान आहे, तेवढंच केरळमध्ये अय्यंकाली यांचं आहे!
अय्यंकाली यांनी केरळमध्ये अस्पृश्यता, निरक्षरता आणि गुलामगिरी यांच्या विरोधात मोठा लढा दिला. जगात अनेक महापुरुष झाले. सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी मोठ्या लढाया लढल्या, पण बैलगाडीतून क्रांती घडवणारा मात्र तो एकमेव होता. एकदा एका पत्रकाराने त्यांना विचारलं होतं, ‘तुमचं स्वप्न काय आहे?’ त्यावर अय्यंकाली उत्तरले होते, ‘डोळे मिटायच्या आधी मला माझ्या समाजातील दहा-बारा विद्यार्थ्यांना पदवीधर झाल्याचं पाहायचं आहे.......